केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रितम मुंडे (pritam munde) यांना संधी न मिळाल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणच्या बैठकीला पंकजा मुंडे (pankaja munde) अनुपस्थित राहिल्याने पुन्हा नाराजीची चर्चा सुरु झाली होती. त्यातच आता भाजपच्या एका बड्या नेत्याने पंकजा मुंडे (pankaja munde) यांची मंगळवारी रात्री भेट घेतल्याच समोर आले आहे.
नाराज असलेल्या पंकजा यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. वरळीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीचा व्हायरल झालेला फोटो )
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या भेटीबाबत भाजपकडून अधिकृतरीत्या कोणतेही माहिती देण्यात आली नाही. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) किंवा पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्याकडून सुद्धा यावर कोणतेही प्रतिक्रिया किंवा माहिती आलेली नाही. त्यामुळे या गुप्त भेटीची चर्चा अधिकच पाहायला मिळत आहे.