जयंत पाटलांवर गुन्हा दाखल होणार..?

बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष धैरशील मोरे यांची मागणी..;

Update: 2022-08-17 14:51 GMT

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची चक्क एस टी बस चालवली. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले. यावेळी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये बसून याचा आनंद घेतला.मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे महागात पडणार आहे कारण बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवले असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.





Tags:    

Similar News