एकनाथ शिंदे यांच्या गटात 3 महिला आमदार...

Update: 2022-06-23 09:07 GMT

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीसच्यावर आमदारांनी बंड केल्यानंतर सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन गुहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. या वेळी सर्व आमदार शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आहेत.

एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले आमदारांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत तीन महिला आमदार सुद्धा दिसत आहेत. फोटोमध्ये दिसत आहेत त्या प्रमाणे यामिनि जाधव, लता सोनवणे व अपक्ष आमदार मंजुळा गावित देखील दिसत आहेत. खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 40 हून अधिक आमदार असल्याचे दिसत आहे.



Tags:    

Similar News