पुण्याच्या भाजप आमदाराकडून पदाधिकारी महिलेला शिवीगाळ...Audio Clip व्हायरल

शिवीगाळ करतानाची आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये ते महिला पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. या प्रकरणावरून आता अनेक जण संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.;

Update: 2021-09-26 11:55 GMT

सध्या समाज माध्यमांवर पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे समोर येत आहे. 'बिल काढता की नाही? काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो. असे म्हणत महिला अधिकाऱ्याला त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नाही तर ते, अत्यंत अर्वाच्य भाषेत त्या महिलेला शिवीगाळ करत असल्याचे सुद्धा या ऑडिओ क्लिप मधून समोर येत आहे.

या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप आणि आमदार सुनील कांबळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी महिलांचा अवमान करणं ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून, महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचं एक उदाहरण आहे. भाजप सारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात असेच कमळ उगवणार असं म्हणत त्यांनी भाजपवर देखील टीका केली. त्याचबरोबर सुनील कांबळे यांनी यासंदर्भात जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी देखील केले आहे.

Full View

या सगळ्या प्रकरणानंतर आमदार सुनील कांबळे यांनी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप जुनी असल्याच म्हंटल आहे.

Tags:    

Similar News