नऊजणांचे फोटो लावून 'काळी जादू' करण्याचा प्रयत्न...

Update: 2019-12-10 08:58 GMT

#मावळ तालुक्यातील तुंग येथे नऊ जणांचे फोटो झाडाला लावून त्यांना लिंबू, काळ्या बाहुल्या, बिबा, टाचण्या, खिळे ठोकून भानामती केल्याची घटना घडली आहे. काळी जादू करण्याच्या या प्रयत्नामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तुंग माध्यमिक विद्यालयापासून जवळच असलेल्या एका अशोकाच्या झाडाला हे फोटो व काळ्या जादूचे साहित्य ठोकल्याचे आढळून आले होते. वेगवेगळ्या गावातील प्रमुखांचे फोटो शोधून ते या ठिकाणी लावले आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे या घटनेची चौकशी करून त्यामागील सूत्रधार व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

पांडुरंग कृष्णा जांभूळकर (रा. कोळे चाफेसर), संदीप एकनाथ पाठारे (रा. तुंग), किसन बंडू ठोंबरे (रा.तुंग) योगेश घाडगे (रा.पानसोली), संजय कोकरे (रा. चाफेसर), संतोष कोंडिबा हघारे (रा.महागांव), कश्वर शेख, अजय मेहता (रा. आतवण), मनोज सेनानी यांच्या फोटोचा वापर या घटनेत करण्यात आला आहे.

या सर्वाचे फोटो लावुन काळी जादु तसेच भानामती करण्याच्या उद्देशाने या 9 जणांचे फोटो घेवुन ते झाडाला ठोकण्यात आले होते.तसेच 9 फोटो तसेच नारळ,लिंबु,असे उतार्‍याचे साहीत्य एका कापडात बांधुन झाडाला बांधले होते.त्याच झाडाखाली नऊ खड्डे खणुन त्यात 9 जणांनचे फोटो,टाचण्या टोचलेले लिंबु,असे साहीत्य पुरण्यात आले होते.

शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्याचा येण्या जाण्याचा रस्त्यात झाडाला लावलेल्या काळ्या बाहुल्या व फोटो लावलेत असे शाळेतील शिक्षकांना सांगितले असता शिक्षकांनी त्या ठिकाणी जावुन पाहिले असता त्यातील फोटो असलेल्या व्यक्तीना या प्रकाराची माहीती दिली.ज्या 9 जणांचे फोटो लावले होते.ते सर्व घटना स्थळी येवुन पाहीले असता.या प्रकारामुळे ते सर्व घाबरले असुन त्यानी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI श्री संदीप घोरपडे सरांनी जागेवर येवुन पाहणी केली व तेथील सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या.

लोणावळा परिसरातील या सर्व व्यक्ती भयभीत झाले होते.त्यांंनी या घटने बाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्हा,कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांना अशा गोष्टी केल्याने कोणाचे वाईट होत नसते.आपण कोणी घाबरून जावु नये.अंनिसचे कार्यकर्ते उद्या आपल्या गावी येवुन या घटने संदर्भात माहीती घेतील असे आश्वासन दिले.

ज्या अज्ञात व्यक्तीने तांत्रीक,मांत्रिका करवी हा भानामतीचा प्रकार करून लोकांच्या मनात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण केली.त्यांच्यावर "जादुटोणा विरोधी कायदा" अंतर्गत गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

-नंदिनी जाधव

Similar News