बाल प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनव अरोरा आहे तरी कोण?

Update: 2024-10-30 12:40 GMT

सध्या समाज माध्यमांवर बाल प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनव अरोरा खूप चर्चेत आहे. एका कार्यक्रमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनव अरोराने टाळी वाजवून राम नावाचा जयजयकार केला, तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी त्याला मध्येच रोखलं आणि त्यानंतर त्यांला मंचावरून खाली उतरवण्यात आलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. अभिनव अरोरा, एक १० वर्षीय उपदेशक आणि आध्यात्मिक सामग्री निर्माता याने त्याच्या भक्ती व्हिडिओ आणि शिकवणींसाठी लक्षणीय लक्ष वेधले आहे. भगवान कृष्ण आणि राधा यांच्या भक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, अभिनवने इंस्टाग्रामवर ९.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स जमा केले आहेत. जिथे तो नियमितपणे हिंदू सण, धर्मग्रंथ आणि धार्मिक नेत्यांशी त्यांच्या संवादांबद्दल पोस्ट करतो. त्याच्या व्हिडिओंमध्ये तो अनेकदा प्रार्थना करताना, धार्मिक अंतर्दृष्टी सामायिक करताना दिसतो.


कोण आहे अभिनव अरोरा?

अभिनव अरोरा हा एक बाल प्रवचनकार म्हणून प्रसिध्द आहे. त्याचा जन्म १२ जुलै २०१४ मध्ये झाला. दिल्लीतील एका शाळेत इयत्ता पाचवीत तो शिकत आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ९ लाख ५१ हजार फॉलोअर्स आहेत. यू ट्यूबवर देखील १ लाख ४७ हजार सबस्क्रायबर्स आणि ५ कोटी १ लाख ६३ हजार व्ह्यूज आहेत. कशा प्रकारे भक्ती करायला हवी? देवाला नैवैद्य कधी, कसा द्यावा? हिंदू धार्मातील एखाद्या दिवसाचे महत्व काय आहे? अशा अनेक प्रकारची माहिती तो व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो.

सोशल मीडियावर अभिनव अरोरा या दहा वर्षांच्या मुलाबाबत रोज नव्या नव्या बातम्या समोर येत आहेत. अभिनव अरोराने टाळी वाजवून राम नावाचा जयजयकार केला, तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी त्याला मध्येच रोखलं आणि त्यानंतर त्यांला मंचावरून खाली उतरवण्यात आलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनव अरोराची टिंगल टवाळी करण्यात येत होती. तसेच त्याला भक्तांनी फोन भेट दिल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता अभिनव अरोराची आई ज्योती अरोरा यांनी त्याला बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याचा आरोप केला आहे. अभिनव अरोराचे कुटुंबिय दिल्लीमध्ये राहतात. अभिनव ३ वर्षांचा असताना त्याचा आध्यात्मकि प्रवास सुरू झाला होता, असा त्याच्या पालकांचा दावा आहे.

अभिनव अरोरा केवळ १० वर्षांचा आहे. या वयात त्याला आध्यात्माची कल्पना नाही. मात्र, आई-वडिलांनी प्रसिद्धीसाठी त्याला भरीस घातले असून बाल संत म्हणून पुढे आणले, अशी टीका सोशल मीडियावरून केली जात आहे. अभिनवचे शिक्षण घेण्याचे वय आहे. त्याला शिक्षण घेऊ दिले पाहीजे. अशाप्रकारे त्याला बाल संत म्हणून पुढे आणल्यास त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News