आज जर पाहिलं तर अनेकांचा आर्थिक स्थर सुधारला आहे. त्यामुळे अनेकांचं राहणीमान देखील सुधरल आहे. काही नाही निदान कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल इतकं तर ते नक्कीच सक्षम झाले आहेत. पण अजूनही अशी अनेक कुटुंबे आहेत जी रोजच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नाहीत. वयाची 70 री गाठली तरी कष्ट हे त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे. कष्टाशिवाय करणार तरी काय हे लोक..केलं नाही तर उपाशी झोपावं लागणार. मग वय झालं काय किंवा किती परिश्रमाचे काम आहे हे असे प्रश्न त्यांना कुठले येणार..जे रोज पोट भरण्यासाठी मरतायत त्यांना कुठलं आलंय वय आणि काय..! पण तरीही ते आनंदाने आपलं आयुष्य जगत आहेत. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करतायत.
सरकार मस्त अनेक योजना या लोकांच्यासाठी बनवतय.बक्कळ पैसे देखील खर्च करतय पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी खरं ना.. हे सगळं लिहिण्याच कारण असं की भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्रंबकेश्वर तालुक्यातील प्रवासादरम्यान त्यांना भेटलेल्या एका वयस्कर आजी ना पैसे मागत होती ना कोणती मदत पण तिला पाहिजे होत रस्ता, पाणी, वीज..स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष लोटल्यानंतर देखील तिच्यापर्यंत अजून या मूलभूत सुविधा देखील पोहोचल्या नाहीयेत..या आजी सारखे अजून कितीतरी लोक असतील जे त्यांच्या अधिकाराच्या मूलभूत गोष्टींपासून वंचित आहेत. चित्रा वाघ यांनी त्यांच्या प्रवासादरम्यान आलेला एका भेटीचा अनुभव फेसबुक वर शेअर केला आहे..त्यांनी हिलेलेली पोस्ट आम्ही खाली देत आहोत..
चित्रा वाघ यांची फेसबुक पोस्ट..
प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवून जातो…..
परवा त्रंब्यकेश्वर तालुक्यात दौरा असतांना खरशेत हून परतत होतो.. रस्ता अर्थात चालतं कुठलही वाहतुकीचं साधन तिथे पोहोचायला किंवा तिथनं पुन्हा परत यायला नाहीचं…..
सहकार्यांसह चाललो असतांनाचं कुडाच्या घराजवळ ती उभी होती…आवाज देत बोलवतं होती
आम्ही गेलो तिचं नाव शांताबाई पांडू पवार…मायेनं पाणी घेणार का ?? म्हणून विचारलं विचारपूस केली
तिथली परीस्थिती…नसलेल्या सुविधा याबाबत सांगत होती…काय मागत होती ती…..पाणी रस्ते वीज रोजगारासाठी साधनं ज्यासाठी हज्जारो कोटीचे बजेट आहेत ते तिला बिचारीला काय माहित ???
शेकडोंनी योजना तिच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आहेत तिची पुढली पिढी निरोगी रहावी यासाठी आहेत पण ज्यांच्यासाठी आहेत त्यांना त्याची माहीती नाही
चालून आमच्या पायात गोळे आलेले ती तर रोजचं चालतीये…अगदी मैलोंमैल
कधी पाण्यासाठी वणवणतं तर कधी रोजगारासाठी…पण चेहर्यावर एकदम 70MM चं हसणं….
६ महिने झाले…खावटी साठी नावं दिली सगळी कागदं दिली…
खावटीतून घरात मीठ मिरची तेल आलं असतं….पण अजून काहीचं नाही मिळालं
इतक्या त्रासात असलेली शांताबाई निघतांना मला मात्र नाचणीचं पीठ घेऊन जा ताई……माझ्या दारातली वांगी घेऊन जा गं…म्हणत होती….माझ्या डोळ्यातं पाणी आलं असं कितीसं पीठ असेल तिच्या घरात ??? तरीही त्यातलं पीठ घेऊन जा म्हणणारी माझ्या दारातली वांगी घेऊन जा म्हणणारी शांताबाईचं मनं किती मोठं…..
जेव्हढं शांताबाईकडे होतं त्यातलं देण्याची तिची इच्छा….
आणी आपण या शांताबाई सारख्या हजारो आदिवासींच्या हक्काचं….अधिकाराचं ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही….
कधी होणारं शांताबाई सारखं आमचं मोठ्ठ मन….।
चित्रा वाघ यांनी शांताबाई या आजींसोबत काही फोटो देखील शेअर केले आहेत..