कोरोनापेक्षा पुरुषसत्ताकतेचा विषाणू अधिक भयंकर

२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा जागतिक स्तरावर महिला हिंसाचार पंधरवाडा म्हणून पाळला जातो. यावर्षी लिंगसमभावाशी निगडीत थीम जाहीर करण्यात आली आहे. आपल्याच देशात नव्हे तर प्रगत समजल्या जाणार्याा देशातही लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचारामुळे मानवाने कितीही प्रगती केली तरी पुरुषसत्ताकतेचा विषाणू एकविसाव्या शतकातही त्याची पाळमुळे घट्ट रोवून उभा आहे हेच समोर आले.;

Update: 2020-11-25 06:08 GMT

'दुआ-ए-रीम' म्हणजे 'दुल्हन की दुआ' ही फिल्म सोशल मीडियावर जागतिक महिला दिनी रिलीज झाली. यात दुल्हन म्हणून पाकिस्तानची अभिनेत्री माहिरा खान यांची प्रमुख भूमिका आहे. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा जागतिक स्तरावर महिला हिंसाचार पंधरवाडा म्हणून पाळला जातो. यावर्षी लिंगसमभावाशी निगडीत थीम जाहीर करण्यात आली आहे.

कोविड पॅनडेमिकमुळे अनेक गोष्टी जगभरात घडल्या, समोर आल्या. यात प्रामुख्याने आपल्या देशातच नव्हे तर प्रगत समजल्या जाणार्यान देशातही लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचारामुळे मानवाने कितीही प्रगती केली तरी पुरुषसत्ताकतेचा विषाणू एकविसाव्या शतकातही त्याची पाळमुळे घट्ट रोवून उभा आहे हेच समोर आले. उन्हाळ्यात आपल्याकडे लग्नसराई असते. लॉकडाऊनमुळे ऐरवी लग्न समारंभ जे मोठ्या प्रमाणात होतात ते होऊ शकले नाही. गर्दी टाळली पाहिजे म्हणून लग्न कमी लोकांच्या उपस्थितीत लागले. यासंदर्भात सोशल मीडियात मुलीची लग्न अशीच सध्या पद्धतीने लागली तर मुलीच्या वडिलांना कर्ज काढावे लागणार नाही किंवा कर्जबाजारी व्हावे लागणार नाही अशा फुटकळ सल्ला आणि तत्वज्ञान सांगण्यार्याच पोस्ट पोस्ट केल्या गेल्या. यामागील वास्तव जर पाहिले तर असे लक्षात येते की, मुलीचे लग्न साधेपणाने झाले असले तरी लग्नाचा खर्च मुलीच्या वडिलांकडून घेतला जातो, ह्या वास्तवकडे डोळेझाक केली जाते. तसेच याकाळात शाळा बंद असल्यामुळे मुलींना घरी ठेऊन काय करायचे म्हणून त्यांचे लग्न लावले जाते. असे अनेक बाल विवाह झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून वाचण्यात आल्या, बाल विवाह होत आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

'दुआ-ए-रीम' ही फिल्म अशाच जुन्या प्रथा-रूढीना मोडीत काढते. देश, भाषा, धर्म, संस्कृती कोणतीही असली तरी यात असणारा एक समान धागा आहे तो म्हणजे 'स्त्री' आणि स्त्री ह्या सगळ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला कशी बळी पडत असते हे वेळोवेळी समोर येते. अशाच व्यवस्थेला स्वत:ची दुआ मागणार्या' नववधूची 'दुआ-ए-रीम' ही फिल्म आहे.

'दुल्हन की दुआ' असे एक गाणे ह्या फिल्ममध्ये चित्रित केले आहे. हे गाणे दोन भागात चित्रित केले आहे. पहिल्या भागात एका मुलीने लग्न झाल्यावर तिच्या सासरी गेल्यावर कसे वागायचे राहायचे ह्यावर पितृसत्ताक पद्धतीच्या अँगलने दर्शविले गेले आहे. यावर नववधू हे माझ लग्न आहे माझ्या लग्नाची दुआ आहे. ही दुआ माझ्यासाठी कशी असली पाहिजे हे सांगत पितृसत्ताक व्यवस्थेला छेद देत एक मुलगी किती सक्षम आहे यावर आधारित तिची दुआ मांडत असते. मुलीची आई जशी राहिली, नवर्यातसमोर कधी मानवर करून बोलली नाही. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा मानात राहिली. नवर्यालने तिला चांगलं खायला नेसायला दिल हेच तिच्यासाठी पुरेसं आहे अशी रीत आहे. हीच रीत पुढे मुलीने मान खाली घालून मान्य करावी आणि संसार करावा अशी दुआ-ए-रीमची प्रथा आहे. हीच शिकवण मुलीच्या यामाध्यमातून दिली जाते. मात्र यातील कलाकार माहिरा खान ह्या दुआवर हरकत नोंदवत माझ लग्न आहे तर दुआही माझीच असली पाहिजे म्हणून गायला सुरुवात करते. तिच्या गाण्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात तिची 'आई' मुख्य केंद्र बनते. तिने तिच्या मुलीला हे काय शिकवले म्हणून त्या सोहळ्यातील सगळ्या स्त्रिया तिच्याकडे हे काय विपरीत घडतय म्हणून तिच्याकडे पाहत असतात तर काही स्त्रिया एक शब्दही न बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहत असतात. या गाण्यातील ओळी आणि त्याचा भावार्थ :

लब पे आवे है दुआ बनके तमन्ना मेरी
ज़िंदगी अम्मा की सूरत हो खुदाया मेरी

अम्मा, म्हणजे मुलीची आई. ही प्रथा सुरू करण्यापूर्वी आई आणि लग्न असलेल्या मुलीला एकत्र बसून गाणे म्हटले जाते. हे गाणे सुरू होते तेव्हा मुलीच्या आईच्या चेहर्याीवरील हावभावावरून हे स्पष्ट होत असते की, तिने तिचे सगळे आयुष्य हिंसा सहन करत तथाकथित कुटुंबासोबत आपल जीवन जगली आहे. येथून पुढे पुढची दुआ सुरू होते :

मेरा ईमां हो शौहर की इताअत करना
उनकी सूरत की न सीरत की शिकायत करना
घर में गर उनके भटकने से अंधेरा हो जावे
नेकियां मेरी चमकने से उजाला हो जावे
धमकियां दे तो तसल्ली हो के थप्पड़ न पड़ा
पड़े थप्पड़ तो करूं शुक्र के जूता न हुआ
हो मेरा काम नसीबों की मलामत करना
बीवियों को नहीं भावे है बगावत करना
मेरे अल्लाह लड़ाई से बचाना मुझको
मुस्कुराना गालियां खा के सिखाना मुझको

ही शिकवण, सल्ले मुलीला लग्नाच्या वेळी दिले जातात. आता अशा प्रथा फारशा होत नसल्या तरी गाण्यात म्हटलं ती परिस्थिती मुलींसाठी काही बदलेली नाही. अशा प्रथावर आवाज उठवत यातील कलाकार माहिरा खान तिच लग्न म्हणून तिची दुआ असली पाहिजे म्हणून परंपरावादी गाणे बंद करून स्वत:ला अपेक्षित असलेले गाणे गात स्वत:ची दुआ अत्यंत अभिमानाने मांडते. 'मेरी दुआ है। हम ख़ुद करेंगें।' उसके बाद उन्होंने जो कहा, वो हर महिला-लड़की को सुनना, देखना, समझना और अपने जीवन में लागू करना चाहिए। असे म्हणत तिची दुआ ती सांगते.

लब पे आती है दुआ बनके तमन्ना मेरी
घर तो उनका हो हुकूमत हो खुदाया मेरी
मैं अगर बत्ती बुझाऊं के अंधेरा हो जाए
मैं ही बत्ती को जलाऊं के उजाला हो जाए
मेरा ईमान हो शौहर से मुहब्बत करना
न इताअत न गुलामी न इबादत करना
न करूं मैके में आकर मैं शिकायत उनकी
करनी आती हो मुझे खुद ही मरम्मत उनकी
आदमी तो उन्हें तूने है बनाया या रब
मुझको सिखला उन्हें इंसान बनाना या रब
घर में गर उनके भटकने से अंधेरा हो जाए
भाड़ में झोंकू उनको और उजाला हो जाए
वो हो शाहीन तो मौला मैं शाहीना हो जाऊं
और कमीने हो तो मैं बढ़के कमीना हो जाऊं
लेकिन अल्लाह मेरे ऐसी न नौबत आए
वो रफाकत हो के दोनों को राहत आए
वो मुहब्बत जिसे अंदेशा-ए-ज़वाल न हो
किसी झिड़की, किसी थप्पड़ का भी सवाल न हो
उनको रोटी है पसंद, मुझको है भावे चावल
ऐसी उल्फत हो कि हम रोटी से खावे चावल

पुरुषसत्ताक आणि लैंगिक समानतेवर जोरदार हल्लाबोल या दुल्हने केला आहे. अशापद्धतीने हल्लाबोल देशातील नव्हे तर जगभरातील स्त्रियांना पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध करावा लागणार आहे. कोविडच्या काळात स्त्री अत्याचाराचे समोर आलेले वास्तव ही भेदभावाची दरी किती खोल आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कायदे खूप असले तरी अंमलबजावणी झाल्याशिवाय त्याचा उपयोग होणार नाही. मुलीच्या लग्नाचे वारी 18 असले काय किंवा २१ केले काय याने कितपत फरक पडेल हा प्रश्न शेष राहतो. म्हणून संविधांनातील समानतेचे मूल्य त्याची रुजवात करणे आवश्यक आहे. दिशा कायदा लागू केला तरी समानतेची मानवी मूल्य अंगिकारले नाही तर दिशाहीनच राहू शकतात.

- रेणूका कड

समन्वयक, महाराष्ट्र राज्य एकल महिला धोरण समिती

Tags:    

Similar News