हैद्राबाद पोलिसांनी केलेला एनकाऊंटर म्हणजे वध!

Update: 2019-12-07 13:14 GMT

आज सकाळी सकाळी मोबाईल चालू केला आणि व्हाट्सअप वर धडाधड मेसेज येऊन पडले हैद्राबाद च्या बलात्कारी आरोपींचा एन्काऊंटर ...

खात्री साठी टीव्ही लावला तर त्याच बातम्यांच्या ब्रेकिंग झळकत होत्या.एक पशुवैद्यकीय महिला डॉक्टर काही नराधमांच्या वासनेचा ठरलेला निष्पाप बळी...गाडी बंद पडली म्हणून टोल नाक्यावर थांबलेली महिला मदतीच्या अपेक्षित उभारली होती पण जे काही पुढे घडणार होते त्या भयानक सत्याची बिचारीला जराही कल्पना नव्हती ...चार नराधमांनी त्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जिवंत जाळले.आणि देशभर एकच रोष उसळला. आरोपीना जिवंत जाळा,त्यांना चौकात फाशी द्या,त्यांना पब्लिक च्या ताब्यात द्या अशा अनेक प्रतिक्रिया उमटायला लागल्या. प्रत्येकाच्या मनात राग खदखदत होता...अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे आणि अशा गुन्हेगारांच्या वर वचक बसलाच पाहिजे एवढीच माफक अपेक्षा...

जेंव्हा गुन्हा उघडीस आला त्या वेळी संपूर्ण देश हादरला.देशातील प्रत्येक स्त्री स्वतःला असुरक्षित समजू लागली.अगदी न्युजचॅनल वर ही बातमी सांगताना अँकर च्या मनात स्वतःच्या सुरक्षिततेच्या विषयी शंका येऊ लागल्या...मुलींच्या आईबापांना स्वतःच्या मुलींची काळजी वाटू लागली.संध्याकाळी 7 नंतर मुलगी घरी नाही आली तर आईबापांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला...पण असं किती दिवस जगणार..?

भारतात बलात्कार सारख्या गंभीर गुन्हा करणाऱ्यां साठी इस्लामी लॉ आणला पाहिजे असे मत माजी पंतप्रधान अटल बिहरी वाजपेयी नि एकदा मांडले होते.आज एन्काऊंटर झाला सर्वसामान्य लोकानी त्याचं स्वागतच केल पण आता खरी सुरवात होईल या केसची... काही मानवाधिकार च्या नावाखाली कुत्र्यांच्या छत्र्या सारख्या उगवलेल्या संघटना आता हा फेक एन्काऊंटर आहे म्हणून छाती बडवून घेतील...असे काही वकील जे राजकारणात स्थिरस्थावर झालेत ते आता गळाकाढून ओरडतील की ही कृती कायद्याला धरून नाही याची चौकशी व्हावी...काही राजकारणातील मोठे पदस्थ ही ओरडायला सुरवात करतील की हा त्या आरोपींवर अन्याय झालाय आणि याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी या साठी आता संसदेत ही पडसाद उमटतील...डोळ्याला मोठा गॉगल लावून काही सामाजिक कार्यकर्त्या जे झाले ते उचित नाही म्हणून मत मांडतील..करण प्रवाहाच्याविरोधात गेलं तर प्रसिद्धी लवकर मिळते हे त्याना चांगलं माहीत आहे.

ज्याचं जातं त्यालाच कळतं म्हणतात ते खोटं नाही बाकीच्यांना प्रत्येक गोष्टीत स्वार्थ साधायचा असतो.याच गुन्हयातील एका आरोपीच्या आईने जाहीर केलं की माझ्या मुलांन गुन्हा केलाय तो गंभीर आहे माझ्या मुलांला ही जिवंत जाळा..सलाम त्या मातेला...जर कायद्याने आरोपीना शिक्षा मिळायची वाट बघत बसलं तर शिक्षा मिळेल कधी हे माहीत नाही.कदाचित कालांतरानं सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका पण झाली असती त्यांचीपण यात पीडितांचे काय?

अजून आशा घटना आहेत की केस लढतालढता पीडित महिला म्हाताऱ्या झाल्या...काही आरोपी कसलीच शिक्षा न मिळताच नैसर्गिकरित्या मरण ही पावले.

कालचीच घटना बघा उन्नव मधील जामिनीवर आलेला आरोपीने कोर्टात पीडित महिला ने जबाब देऊ नये म्हणून चाकूने हल्ला करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला..

भारतात कसला ही गुन्हा केला तरी जामीन मिळतो हे प्रत्येक आरोपीला माहीत आहे.आणि मग वर्षानुवर्षे केस चालत राहते...या दरम्यान ज्यानं बलात्कार केलाय त्याच धुमधडाक्यात लग्न होत.पण जिच्या वर बलात्कार झालाय तिचे कधी लग्न होत नाही..हा विरोधाभास..हैद्राबादच्या केस मध्ये टीव्ही वर एकांन मत मांडलं की बलात्कार झाल्यानंतर पीडिताला जिवंत जाळायला नको होतं..बोलणं सोपं आहे जर ती जिवंत असती तर समाजानं तिला जगू दिलं असतं का ? रोज ती मेली असती..आणि रोज समाजाच्या नजरेतून ती घायाळ झाली असती...अशा केस मध्ये समाजानं पण दृष्टिकोन बदलला पाहिजे.

झालेला एन्काऊंटर खरा की खोटा या वादात पडायचच नाही पण जे झालय ते योग्यच झालय असे काही घडल्या शिवाय आशा गंभीर घटनांना आळा बसणार नाही कोणत्याही बदलाची सुरवात ही कठीणच असते.हैद्राबाद पोलिसांनी जर फेक एनकाऊंटर केला असेल तर तो योग्यच म्हणावा लागेल कारण त्यांनी आरोपींना मारले नाही तर त्यांचा वध केलाय ..आणि वध हा राक्षसी प्रवृत्तीचाच होतो.

 

-प्रशांत जाधव (पत्रकार)

Similar News