अलका त्यागी, १९८४ च्या आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची २०१९ मध्ये नियुक्ती मुख्य आयकर आयुक्त (युनिट २) मुंबई येथे होती. साहजिकच त्यांच्याकडे अनेक हायप्रोफाईल केसेस येतात. अशाच काही केसेसमध्ये त्यांनी रुटीन कारवाई सुरु केलेली होती. त्यांना एप्रिलच्या शेवटी आणि मे च्या सुरुवातीला दिल्लीला बोलावण्यात आलं. दिल्लीत साउथ ब्लॉक मध्ये केंद्रीय आयकर बोर्डाचे चेअरमन प्रमोदचंद्र मोदी यांनी बोलावून घेऊन सूचना दिल्या.
काय सूचना दिल्या?
"या हायप्रोफाईल केसेस संवेदनशील माणसांच्या आहेत, सबब यामध्ये पुढे कारवाई करू नये.“
अलका त्यागीनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की असं करण आता अशक्य आहे, कारण नोटीसा इश्यू झाल्यात.
मोदींनी सांगितलं, “हे तुम्हाला करावंच लागेल, पर्याय नाही, मी सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीसा पाठवून, त्यांच्या विरोधात कारवाया करूनच माझी जागा टिकवून ठेवलेली आहे.“
सध्या मोदींना निवृत्तीनंतर एक वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे. अलका त्यागी बधेनात म्हणून त्यांच्या विरोधातली जुनी खातेनिहाय चौकशीची फाईल ज्यामध्ये त्यांना क्लिन चीट मिळालेली आहे. ती पुन्हा ओपन करून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
या सगळ्यांच्या विरोधात अलका त्यागींनी तक्रार केलीय. ज्याची प्रत त्यांनी प्रधानमंत्री कार्यालय, मुख्य दक्षता आयुक्त आणि देशाच्या मुख्य सचिवांना पाठवलेली आहे.
आता प्रफुलचंद्र मोदी ज्या ‘महत्वाच्या‘ केसेस कडे दुर्लक्ष करायला सांगताहेत त्या केसेस कोणत्या?
दीपक-चंदा कोचर, आयसीआयसीआय-व्हिडियोकॉन
मुकेश अंबानी कुटुंबाला काळ्या पैशाबाबत दिलेल्या नोटीसा,
जेट एअरवेज आणि नरेश गोयल !!
या सगळ्यांचा नेमका अर्थ काय निघतो? सरकार अधिकाऱ्यावर कसा दबाव आणते आहे. सरकार आयकर विभागाला विरोधी नेत्यांना धमकावून पक्षात प्रवेश करायला कस भाग पाडत आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांना कसा त्रास दिला जातो आहे.
घाऊक प्रमाणात झालेल इनकमिंग नेमकं कशामुळे झालेलं आहे आणि विरोधी नेत्यांना अचानक भाजप बद्दल प्रेम का वाटू लागलेलं आहे. याचा खुलासा या सगळ्या प्रकरणात प्रफुलचंद्र मोदींच्या कबुलीने होतो आहे.
सूचना :- हे खरंय का की शितोळे नुसतीच आरोपांची राळ उठवत आहेत. यासाठी इंडियन एक्स्प्रेसच्या ५ ऑक्टोबर २०१९ च्या बातमीची लिंक सोबत जोडली आहे
उपसूचना : सत्तर वर्षांची घासून गुळगुळीत झालेली टेप वाजवायला येऊ नये, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्हाला पण गु खाऊ द्या ना गडे या टाईपचा युक्तिवाद तुमच्या मालकांच्या " ना खाऊंगा ना खाने दुगा " या घोषणेचा चिंध्या करतोय, अर्थात मंदबुद्धी लोकांना एवढं लक्षात कुठून यावं.
- आनंद शितोळे