राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. रीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत. दरम्यान निकाल कधी लागणार याबद्दल मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होता. सोशल मिडियावर यासंदर्भातील वेगवेगळ्या तारखांबद्दलच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही चिंता वाढली होती.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जारी केली आहे. निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?
http://www.hscresult.mkcl.org/
http://results.maharashtraeducation.com/
या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकाल पाहाता येणार असून सोबतच प्रिंट काढता येईल असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.
निकाल पाहाण्यासाठी काय कराल...
> वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
> वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
> आसनक्रमांक टाका
> विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
> निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
> निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल