नग्न बायको कोविडच्या झूम कॉलवर, नेत्याची पंचाइत
तुमचा खासगीपणा जपा, नाहीतर तुमच्याही व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप व्हायरल होतील;
कोरोनामुळे संपुर्ण जग पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. खबरदारिचा उपाय़ म्हणून जगभारात अनेकांना झूम कॉल फायद्याचा ठरतोय. यामाध्यमातून ऑफीसच्या, ऑनलाइन क्लास ते अगदी समाज प्रबोधनाची चर्चासत्र देखील घेतली जात आहेत. पण, याच झूम कॉलमुळे अनेकांच्या व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खासदीपणा चव्हाट्यावर आलाय.
असाच काहीसा किस्सा आफ्रिकेतील एका मोठ्या नेत्यासोबत घडला आहे. झोली नदेवू असे त्या नेत्याचं नाव असून, झूम कॉलवर आफ्रिकेतील कॉवीड संसर्गावर आढावा बैठकसुरु असताना अचानक त्यांची पत्नी नग्नावस्थेत कॅमेऱ्यासमोर आल्याने त्यांना मीटिंग स्थगीत करावी लागली.
या झूम मिटींगमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकूण 23 मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी झोली नदेवू (Xolile Ndevu) बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांसमोर पूर्व केपटाऊनमध्ये स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने कशाप्रकारे मदतकार्य सुरु आहे याची माहिती देत होते. ते बोलत असतानाच अचानक त्यांची पत्नी अंघोळ करुन बाथरुममधून नग्नावस्थेतच बाहेर आली. काही क्षण त्या या झूम मिटींमध्येही नग्न अवस्थेत दिसल्या. त्यामुळे संसदीय समितीच्या प्रमुखांनी तातडीने हस्तक्षेप करत बैठक स्थगित केली आणि या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
बर झूम कॉल मधील व्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाहीय. याआधी श्वेता नावाच्या एका मुलीचा झूम कॉलमधील ऑडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती तिच्या मैत्रीणीच्या सेक्स लाइफ बद्दल बोतल होती. त्यामुळे लोकहो झूम कॉल करताना तुमचा खासगीपणा जपा, नाहीतर तुमच्याही व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप व्हायरल होतील.