ऑनलाइन शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांनी जीव द्यायचा?

केंद्रातील राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनो उत्तर द्या..;

Update: 2021-06-18 09:15 GMT

2020 साली कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आलं. पण केवळ मोबाइल नाही म्हणून अनेक मुलं शिक्षणापासून वंचीत आहेत. यातुनच आत्तापर्यंत अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.

याच ऑनलाइन शिक्षणामुळं नांदेड जिल्ह्यातील एका शेतमजुराच्या कुटुंबाचा आधार हरवला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइलची मागणी करूनही मोबाइल न मिळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं. तिनं 16 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव बुद्धशीला प्रकाश पोटफोडे आहे. १६ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नायगाव शहरातील फुलेनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. नायगाव शहरातील फुलेनगर येथील रहिवासी प्रकाश पोटफोडे हे पती-पत्नी मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून दोन्ही मुलेही मजूरी करून शिक्षण घेतात.

बुद्धशीचे आई-वडील मोलमजूरी करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह चालवतात. बुद्धशीला दोन भाऊ देखील आहे. हे दोघंही मोलमजुरी करून आपलं शिक्षण घेत होते. 'आम्ही तिला मोबाईल घेऊनच देणार होतो, पण त्याआधीच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं तिचा भाऊ अमोलनं सांगितलं.'

परिस्थितीमुळे शिकायला मोबाइल घेवू शकत नाही म्हणून घडलेली ही पहिलीच आत्महत्या नाहीय. याआधी

1. कराड तालूक्यातील औध इथं रहाणाऱ्या साक्षी पोळ या नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली होती.

2. अकोल्यातील पायल घवयी या 10वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली होती

राज्यातील या तीन घटना ग्रामीण भागातील मुलांना येणाऱ्या अडचींनींच आणि सरकारच्या फसलेल्या नवीन ऑनलीन शिक्षण पध्दतीचं प्रतिनिधीत्व करतात.

Tags:    

Similar News