केंद्र सरकार आणि UGC ला कळत नाही का? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

Update: 2020-07-23 01:24 GMT

गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात यूजीसीच्या विरोधात लढा देत आहे. लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या युजीसीला (University Grants Commission) भावना शून्य माणुसकी व मेलेलं धड म्हणून रविवारी अमावस्येच्या रात्री विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी युजीसीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. “विद्यार्थी त्रस्त है,युजीसी मस्त है” अशी घोषणाबाजी विध्यार्थ्यांनी दिली.विद्यार्थी हा कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडला असून, परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नाहीत हे सरकरला व युजीसीला का कळत नाही? असा सवाल विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला आहे.

https://youtu.be/5UrcPZKlEwA

Similar News