किन्नर संघटनांनी घेतली राज्यपालांची भेट

कोरोना काळात आरोग्य सुविधांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप देखील या संघटनांनी केला आहे.

Update: 2021-03-05 09:45 GMT

"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आर्टीकल 15 मध्ये सांगीतलं आहे, 'कुणालाही जातीभेदाच्या आणि लिंग भेदाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही. आणि असं असूनही आमच्या बाततीत भेदभाव होतो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा देखील पुर्ण होत नाहीत." लोकहो ही कैफीयत आहे तृतीयपंथी बांधवांची.

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य सुविधा, किन्नरांना ओळखपत्र, किन्नर आश्रम, किन्नरांवर होणाऱ्या अत्याचार इत्यादी मागण्यांसाठी न्याय मिळण्यासाठी किन्नर संघटनेच्या सदस्यांकडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेण्यात आली.

यावेळी किन्नरांना भेडसावणाऱ्या समस्या राज्यपालांसमोर मांडण्यात आल्या. तसेच किन्नरांना मानधन सुरू करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली.

Tags:    

Similar News