सैनीकाच्या पत्नीचा भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप
आरोपीने केले बलात्काराचे शुटींग, व्हिडीओ व्हायरल करण्याची द्यायचा धमकी;
मध्य प्रदेशमधील एका सैनीकाच्या पत्नीने भाजप नेते राजेश श्रीवास्तव यांच्या विरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलींगचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजेश श्रीवास्तव हे भाजप युवा मोर्चाचे नेते असून ते सावरकर प्रभागाचे अध्यक्ष आहेत.
सैन्यातील जवानाची पत्नी घरात एकटी राहते, तेव्हा ही संधी साधून आरोपी राजेश श्रीवास्तव तिला भेटण्यासाठी जात असे. एकेदिवशी आरोपीने पीडित महिलेला एक कप चहा मागितला तेव्हा त्या महिलेच्या चहाच्या कपात नशेचा पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध केले.
आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार करत त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले, त्याचआधारे तो महिलेला ब्लॅकमेल करत होता, आरोपी पीडित महिलेला अश्लिल मेसेज पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी देत होता. त्याचसोबत आरोपीने १० लाख रुपये मागितल्याचा दावा देखील पीडितेने केला आहे.
पीडित महिलेने जेव्हा तिचा पती सुट्टीला घरी आला, तेव्हा हा सगळा प्रकार त्याच्यावर कानावर टाकला, यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात १८ मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
दरम्यान, सध्या आरोपी राजेश श्रीवास्तव फरार आहे.