१७ वर्षाच्या मुलीने केला ४४ जणांविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल!

केरळ मधील निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊन्सिलींगदरम्यान मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा धक्कादायक खुलासा केला आहे.

Update: 2021-01-19 09:30 GMT

गेल्या काही काळापासून देशात बलात्काराच्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना केरळमध्ये घडली असून एका १७ वर्षाच्या मुलीवर तब्बल ४४ जणांनी बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. केरळ मधील निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊन्सिलींगदरम्यान मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा धक्कादायक खुलासा केला आहे.

खळबळजनक बाब म्हणजे यापैकी कित्येक आरोपी हे मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने निर्भया केंद्रावर काऊन्सिलिंगदरम्यान या भयंकर प्रकाराची माहिती दिली आहे. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील पल्लकडमध्ये या मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीच्या केल्याच्या आरोपाखाली ४४ पुरुषांविरोधात ३२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

तक्रार दाखल करण्यात आलेल्या ४४ जणांपैकी आतापर्यंत फक्त २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर २४ जणांचा शोध सुरू आहे. ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींपैकी अनेक जण न्यायालयीन अटकेत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

गेल्या काही दिवसात केरळमध्ये बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. NCRB च्या एका रिपोर्टनुसार १०० टक्के शिक्षित लोकसंख्या असलेलं राज्य बलात्काराच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रती लाख लोकसंख्येत ११.१ महिलांवर बलात्कार झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

केरळ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच एकाच मुलीवर ४४ जण वेळोवेळी बलात्कार होते, अशा वेळी पोलीस काय करत होते? पोलीस महिलांनी कोणती माहिती दिल्यावर कारवाई करणार नाहीत हे वातावरण निर्माण झालंय का? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

Tags:    

Similar News