यवतमाळ जिल्हा पोलीस दलात आता महिला वाहन चालक दिसणार आहेत. यासाठी 11 महिलांच ट्रेनिंग आता पूर्ण होत असून, या महिलांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. या विभागात आतापर्यंत पुरूष मंडळीच वाहन चालक म्हणून कार्यरत होती. मात्र आता यात महिलांचाही समावेश होणार असल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.
या बाबत बोलताना मोटार परिवहन अधिकारी राजेंद्र जाधव म्हणाले की, “पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळाल्या नंतर विभागात अनेक महिला दाखल झाल्या. पण या जरा वेगळ्या आहेत. या सर्व महिला शेतकरी कुटुंबातील असून त्या जिल्हा पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाल्या. आता त्यांचे ट्रेनिंग पूर्ण होत असून त्या लवकरच पोलीस दलातील वाहन चालक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.” असं म्हटलं आहे.
https://youtu.be/nn90pxulGY4