"आता आम्हाला दाखवुन द्यावं लागेल इथं आम्ही ही आहोत.."
“सध्या पुरुषांना असं वाटतय की हे जग फक्त त्यांचंच आहे. पण आता आम्हाला दाखवुन द्यायचय की नाही आम्ही पण आहोत इथं..” हे शब्द आहेत लाठिकाठी फिरवत स्वसंरक्षणाचे धडे गिरवणाऱ्या महिलेचे.
"सध्या पुरुषांना असं वाटतय की हे जग फक्त त्यांचंच आहे. पण आता आम्हाला दाखवुन द्यायचय की नाही आम्ही पण आहोत इथं.." हे शब्द आहेत लाठिकाठी फिरवत स्वसंरक्षणाचे धडे गिरवणाऱ्या महिलेचे. महिलांच्या वरील अत्याचाराची श्रृंखला काही थांबत नाही आहे. याचा परिणाम समाजात दिसून येत असून पालक व महिलांमध्ये भितीचं वातावरण आहे.
सरकार मदत देतं पण महिलांचा सरकार आणि समाजातील व्यक्तिंवरील विश्वास कमी होत चालला आहे. म्हणूनच या महिलांनी स्वत: व आपल्या मुलींना मार्शल आर्ट चे धडे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलींनी आता कथ्थक शिकण्याऐवजी कराटे शिकलं पाहिजये. Max woman चे प्रतिनिधी किरण सोनवणे यांचा रिपोर्ट...