‘मिसा Online' म्हणजेच मिळून साऱ्या जणी या मासिकाच्या फेसबूक पेजवर पहिल्या 'मिसा Online गप्पा' घेण्यात आल्या. अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर मृण्मयीने अलीकडेच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. मराठी सिनेजगताचा विचार करता दिग्दर्शनाचं क्षेत्र प्रामुख्याने पुरूष प्रभावित राहिलेलं आहे. तेव्हा तिच्या या प्रवासाबाबत तिच्याशी गप्पा मारण्यात आल्या. हा इंटरव्ह्यू मिसाच्या प्रतिनिधी अमृता शेडगे यांनी घेतला आहे.