farmers protest ला पाठिंबा म्हणून मियाने शेअर केला व्हिडीओ

पाहा काय म्हटलय मिया खलिफाने या व्हिडीओत;

Update: 2021-02-08 03:00 GMT

पॉर्न स्टार मिया खलीफाने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर भाष्य करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शेतकरी आंदोलनाचं समर्थन केल्यानंतर मिया खलीफाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आता मिया खलिफाने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात तिने अनोख्या पद्धतीने शेतकऱ्याचे आभार मानत पुन्हा शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय.

काय म्हटलय मियाने या व्हिडीओत..

मिया खलिफा या व्हिडीओत म्हणाली, "खूप कष्ट करणे आणि त्यानंतर काही तरी मिळवणे ही भावना खूप चांगली आहे. जसं की मला आज हे स्वादिष्ट जेवण मिळालंय. माणुसकीच्या नात्याने सोशल मीडियावर मी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने मला हे जेवण मिळालंय. त्याबद्दल मी रुपी कौर यांचे आभार मानते. याशिवाय या अप्रतिम गुलाम जामुनसाठी जगमीत यांचेही आभार."

"या स्वादिष्ट जेवणासाठी रूपी कौरचे धन्यवाद. गुलाब जामुन देण्यासठी जगमीत सिंह यांचे आभार. मला नेहमी काळजी असते की जेवणानंतर पोट भरल्याने गोड पदार्थ खायला माझ्या पोटात जागा राहत नाही. त्यामुळे आज मी जेवताना मध्येच गुलाब जामुन खाईल. तुम्हाला माहिती आहे का की दररोज एक गुलाब जामुन खाल्ल्यावर सामंतवाद दूर राहतो असं ते म्हणतात. प्रत्येक गोष्टीला किंमत असते"


Tags:    

Similar News