नागपुरात महिलांनी दिले मोदी सरकार मुर्दाबादचे नारे
किसान महिला सन्मान दिनानिमीत्त नागपुरच्या संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
सर्वोच्च न्यायालयात महिलांविषयी चुकीचे विधान केल्याप्रकरणी निषेध म्हणून किसान महिला सन्मान दिन पाळला गेला. यासाठी नागपुरात संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय कशाच्या आधारे दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना घरी जायला सांगतंय? . हे सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
या घटनेचा निषेध म्हणून एका आंदोलकाने चक्क साडी नेसुन मोदींचा मुखवटा घातला व महिलांनी त्याला बांगड्या घातल्या. यावेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हे आंदोलन आयटक तर्फे करण्यात आले.