"प्रतिष्ठेचं पांघरुण घालून सत्य दडपू नका" शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर कोण काय म्हणालं?

Update: 2020-12-01 06:45 GMT

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि विकास आमटे यांच्या कन्या डॉ शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक दिग्गजांनी आपल्या भावना आणि व्यक्त केल्या आहेत. यात काहिंनी "शितल तू चुकलीस" असं म्हटलं आहे. तर, काहिंनी या संपुर्ण प्रकरणाची कसुन चौकशी करण्याची मागणी केली.

कोण काय म्हणालं?

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी शीतल आमटे यांची आत्महत्या मीडिया ट्रायलचा बळी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विश्वंभर चौधरी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये

"भ्रष्ट आणि महाभ्रष्टांवर एक ओळही लिहीण्याची हिंमत नसलेले पत्रकार आणि माध्यमं संधी मिळताच समाजसेवकांच्या प्रत्येक गोष्टीवर सूक्ष्मदर्शक यंत्र लावून खरी खोटी तपासणी करतात. संशयाला लीलया आरोपात बदलतात. हे माहीत आहे की काहीही लिहीलं तरी तिथून धमकी सुद्धा येऊ शकत नाही, उपद्रव तर दूरच! महाभ्रष्ट नेत्यांची कौतुकं आणि समाजसेवींना मात्र फक्त आरोपी करत रहायचं. शीतल आमटे मिडीया ट्रायलचाही बळी आहे का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.


राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी "महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी आहे. आनंदवनातील विविध प्रकल्प आणि उपक्रमांची त्या भेटून आवर्जून माहिती देत असत.‬ त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,अशी मी प्रार्थना करतो.‬ भावपूर्ण श्रद्धांजली..." असं म्हटलं आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी "ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ शीतल आमटे-करजगी यांचे निधन झाले. ही बातमी धक्कादायक आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." असं म्हटलं आहे.


ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी "प्रतिष्ठेचं पांघरुण घालून सत्य दडपू नका. शीतल आमटेला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या आत्महत्येची चौकशी करा" अशी मागणी केली आहे.


दरम्यान, शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. मागील काही दिवसांपासून आमटे कुटुंबीय यांच्यात वाद असल्याची माहिती समोर आली होती. शीतल आमटे यांनी गंभीर आरोप केले होते.

Tags:    

Similar News