"कोवीड लसीकरणाचे उत्कृष्ट व्यवस्थापन"
IAS अधिकारी आश्विनी भिडे यांनी शेअर केला लसीकरणाचा फोटो;
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात आली आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योध्यांना प्राधान्य दिले जाइल असं शासनाने जाहिर केलं. या पहिल्या टप्प्यात लस घेवून अनेकांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी देखील या पहिल्या टप्प्यातील लस घेवून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "आज मुंबई महानगर पालिकेच्या नायर हॉस्पीटल येथे कोवीड लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणाचे उत्तम व्यवस्थापन करण्यात आलंय." असं ट्वीट आश्विनी भिडे यांनी केलं आहे.