आजचा रंग नारंगी रंग पोषणाचा, महिला बालविकास विभागाची अभिनव जाहिरात

Update: 2023-10-15 06:59 GMT

यंदाच्या नवरात्रीत महाराष्ट्र शासनाने अभिनव उपक्रम राबवला आहे. आजचा रंग नारंगी म्हणून संत्र्याचे फायदे सांगणारी जाहिरात महिला व बालविभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये रंगाचे महत्व सांगणारे अनेकजण आपली संकल्पना मांडत असतात. त्याचा फायदाही लोकांना होतं असतो. या नवरात्रीतील ९ दिवसात नवरंगाच्या साड्या परिधान केल्या जाता. त्याप्रमाणे आजच्या रंगाचं महत्व सांगणारी जाहिरात महिला व बालविभागाकडून प्रसिध्द करत नारंगी रंगाचं महत्व पटवून दिलं आहे.

याकाळात कोणत्या दिवसाचा कोणता रंग परिधान करावा याची जाहिरातबाजी होतं असते. यामुळे याला एक उत्सावाचं स्वरूप आलेलं आहे. याचाच फायदा घेत जाहिरातीच्या माध्यमातून रंग पोषणाचा संदेश लोकांपर्यंत पोहचावा यासाठी महिला व बालविकास विभागाने अभिनव संकल्पना मांडत विविध रंगांच्या भाज्या, फळ-भाज्या, फळ यातून मिळणारे पोषक तत्वे, जीवनसत्वे यांचा प्रचार प्रसार करण्याचा हा प्रयत्न केला आहे. नवरात्रीचे नव रंग पोषणाचा म्हणून महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांमधून  प्रसिद्धी दिली आहे . 









 


 


Similar News