1 एप्रिलपासून, वॉलेट किंवा कार्ड यांसारख्या प्रीपेड साधनांद्वारे 2 हजार रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर 1.1% पर्यंत इंटरचेंज चार्ज आकारले जाणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), यूपीआय चालवणारी संस्था, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे केलेल्या व्यवहारांवरील शुल्कासंबंधी माहिती देणारे एक परिपत्रक जारी केले आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही आहे. तर काय आहे हे पाहुयात..
बँक खाते ते खाते व्यवहार विनामूल्य असतील..
अलीकडे यूपीआय द्वारे अत्यंत जलद आणि तितकच सुरक्षित डिजिटल पेमेंटच्या प्रकाराला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. तसं पाहिलं तर यूपीआय पद्धतीचा वापर करून व्यवहार करण्यास लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. यामध्ये कोणत्याही एक UPI आपल्या बँक खात्याशी जोडला जातो. आणि त्या द्वारे सर्व ट्रॅन्जेक्शन केले जाते. मग आता सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की? या नवीन नियमानुसार खाते ते खाते असं ट्रांजेक्शन करत असताना आपल्याला त्याची पैसे मोजावे लागणार का? तर तसं अजिबात नाही बँक खाते ते खाते व्यवहार ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी मोफत असणार आहे.
NPCI ने आता PPI वॉलेट्सना इंटरऑपरेबल UPI इकोसिस्टमचा भाग म्हणून परवानगी दिली आहे. सादर केलेले इंटरचेंज शुल्क फक्त PPI व्यापारी व्यवहारांसाठी लागू आहे आणि ग्राहकांना लागू नाही. आणि हे देखील स्पष्ट केले आहे की बँक खाते ते बँक खाते आधारित UPI पेमेंट (म्हणजे सामान्य UPI पेमेंट) साठी कोणतेही शुल्क नाही.
NPCI चे इंटरचेंज चार्ज कोणत्या व्यवहारांवर लागू होईल?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे पेमेंटवर 0.5% ते 1.1% पर्यंत PPI शुल्क लागू करण्याची सूचना केली आहे. CNBC-TV18 च्या बातमीनुसार, UPI द्वारे 2 हजार रुपयांच्या व्यवहारावर 1.1 टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची सूचना करण्यात आली आहे.