कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर एकत्र येणार का?

Update: 2019-09-19 09:49 GMT

सुनील ग्रोवरने आणि कपिल शर्मा यांच्यातील झालेल्या वादामुळे सुनिलने शो सोडला होता. त्यानंतर आता सुनील ग्रोवरने केलेल्या ट्विट वरून तो पुन्हा कपिल शो मध्ये दिसणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. यामुळे सर्व चाहत्यांना याची उत्सूकता लागली आहे.

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत असताना वाद झाला होता. या वादात कपिल नको ते बोलल्याने सुनिलचा अंहकार दुखावला गेला. त्याने शो सोडून दिला होता. त्यामुळे कपिलच्या शो चा टीआरपी देखील घसरला होता. व्यसनाधीन झालेल्या कपिलचा शो सोनी टीव्ही ने बंद केला. यानंतर वर्षभरानंतर ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरू झाला. परंतू भांडणानंतर कपिल आणि सुनिल ची जोडी पुन्हा दिसलीच नाही.

फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांनी ही जोडी परत एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. यात सलमान देखील सहभागी होता. कपिलनेसुद्धा त्याची माफी मागितली होती. आणि शोचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमीच खुले असल्याचं स्पष्ट केलं होतं. तरीदेखील सुनिल परत आला नाही.

परंतू आता सुनील ने केलेल्या ट्विट नंतर सुनील या शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. या चर्चेला आता उधाण आलं आहे. त्याने ट्विट करत , “प्रत्येक गोष्ट येणार आहे. काहीही कायमचे राहणार नाही. म्हणून फक्त कृतज्ञ राहा आणि हो, खळखळून हसा. बाकी… मेरे हस्बंड मुझको…,” यामुळे सुनिल आणि कपिल ची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांसमोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Similar News