सोमवारी म्हणजे 9 डिसेंबर रोजी सोनिया गांधी यांचा 73 वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि उन्नाव पिडीतेचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे.
कांग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. सोनिया गांधी यांच्या या निर्णयाचं सोशल मिडीया वर स्वागत करण्यात आलं आहे. रविवारी #SoniaGandhi असा हॅशटॅग ही ट्रेंडींग मध्ये होता.