कॉल आणि मेसेज आल्यावर स्मार्ट व्हायब्रेशनसह अलर्ट देणारा U&I प्राइम नेकबँड लॉन्च.. यामध्ये या आहेत खास गोष्टी...

Update: 2021-11-19 02:43 GMT

U&I प्राइम, भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी U&I च्या उप-ब्रँडने, कमी-बजेटचा स्मार्ट नेकबँड इयरफोन, Shuffle 4 लॉन्च केला आहे. शफल 4 हा पुढच्या पिढीचा नेकबँड आहे. यामध्ये मॅग्नेटिक स्विच कंट्रोल, स्मार्ट व्हायब्रेशन्स, सुपरफास्ट चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याच वेळी, यात 15 तासांचा बॅटरी बॅकअप आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे उत्तम ऑडिओ क्वालिटी मिळते.

नेकबँक किंमत 999 रुपये इतकी आहे.

नेकबँड एबीएस प्लास्टिक आणि स्किन फ्रेंडली सिलिकॉनपासून बनलेला आहे. हा नेकबँड IPX-5 प्रमाणित आहे. म्हणजेच ते धूळ आणि पाणी प्रतिरोधक देखील आहे. या नेकबँडची किंमत 999 रुपये इतकी आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते खरेदी करू शकाल. कंपनी त्यावर 1 वर्षाची वॉरंटीही देत ​​आहे.

शफल 4 नेकबँडचे Specifications

शफल 4 इयरफोनमध्ये निओडीमियम मॅग्नेट देण्यात आले आहेत. वापरात नसताना ते आपोआप बंद होते. यात सिलिकॉन इअरटिप्स मिळतील जे बाहेरचा आवाज रोखतात.

इयरफोनमध्ये मायक्रो मोटर देण्यात आली आहे. कॉल किंवा संदेश प्राप्त करताना ते vibration करते. जेव्हा स्मार्टफोन सायलेंट मोडमध्ये असतो, तेव्हा हे उपकरण तुम्हाला स्मार्ट व्हायब्रेशन तंत्रज्ञानासह कॉल आणि मेसेजबद्दल अलर्ट देते.

मजबूत बॅटरी - शफल 4 ने फास्ट चार्जिंगची सोया यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याची बॅटरी एका चार्जवर 15 तासांचा बॅकअप देते. एवढेच नाही तर या इअरफोनची बॅटरी 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 6 तासांचा बॅकअप देते.

Tags:    

Similar News