आज सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलेले आहे. सत्ता स्थापना व त्यानंतर रंगलेले मंत्रीपदाचे नाट्य यात अजित पवार (Ajit Pawar)केंद्रस्थानी होते. आज मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याचं जवळ जवळ निश्चित समजलं जात आहे. त्यामुळं पवार कुटुंबियांसाठी हा आनंदाचा दिवस आहेच. त्याचबरोबर आज अजित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar )यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे.
अजित पवार हे नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असतात. त्यामुळं बारामती मतदार संघातील जवळ बरीचशी काम सुनेत्रा पवार पाहत असतात. लोकांना भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्या सोडवणं यासाठी सुनेत्रा पवार मतदारसंघात सतत सक्रीय असतात. विद्याप्रतिष्ठानच्या कार्यात सुनेत्रा पवार यांचा मोठा सहभाग असतो.
विशेष बाब म्हणजे तडफदार नेतृत्व म्हणून अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र, अजित पवार यांचा कणा बनून त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणाऱ्या सुनेत्रा पवार तितक्याशा माध्यमांसमोर येत नाही. अजित पवार यांच्या यशामध्ये सुनेत्रा पवार यांचा मोलाचा वाटा आहे. पवारांच्या काठेवाडी म्हणून नाव लौकीक असणाऱ्या या गावाचा चेहरा मोहरा सुनेत्रा पवार यांनी बदलला. आज हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. समाजकारणातून सतत लोकांची सेवा करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना मॅक्सवूमन कडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!