हे सरकार जाहिरातींवर उधळपट्टी करणारं आहे-  उर्मिला मातोंडकर

Update: 2019-04-02 09:25 GMT

उत्तर मुंबई मतदारसंघाच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. मतदारसंघातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी मतदारसंघातील समस्येला तसेच पाच वर्षात देशाचा केलेला खेळखंडोबा मांडला आहे. हे सरकार जाहीरातींवर उधळपट्टी करणारं सरकार आहे. महिलांसाठी एकच लोकल सुविधा देणाऱ्या सरकारला धडा शिकवलाच पाहिजे. तसेच मी राजकारणात सक्रीय झाल्यापासून सोशल मीडियावर मला ट्रोल करण्यात येत आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर टीका –टिप्पणी केली जात आहे. म्हणून मी माझ्या जाती, धर्माचा कुठलाही पुरावा देणार नाही मला घटनेनं दिलेला हा अधिकार आहे. नेमकं काय म्हटल्या उर्मिला मातोंडकर पाहा हा व्हिडिओ...

 

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/400620390773650/

Similar News