आरे वृक्षतोड : हे कलाकार भडकले

Update: 2019-10-05 11:00 GMT

आरे कॉलनी येथे मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी रात्रीच्या सुमारास वृक्षतोड करण्यात आली. वृक्षतोडीची माहीती कळताच सर्व पर्यावरणप्रेमी या प्रकाराला विरोध करण्यासाठी आरेत पोहचले. तर, अनेक कलाकारांसह बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि उर्मीला मांतोडकर यांनीदेखील सोशल मिडीयामार्फत संताप व्यक्त केला आहे.

मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी जवळपास अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उच्च न्यायलयाने फेटाळून लावले असुन न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसामान्य जनतेसह कलाकारही या आंदोलनात सहभागी होत आहेत.

 

Similar News