कलम ३७० रद्द झाल्या बद्दल तृप्ती देसाई यांनी भाजप सरकारचे अभिनंदन केले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्या सांगतात मात्र त्याच वेळेस लोकसभेत आपण धर्माच राजकारण करत नाही असं अमित शहा म्हणतात तेव्हा सबरीमाला प्रकरणाला वेगळा न्याय का देता ? असा सवाल विचारला. ट्रिपल तलाक मध्ये धर्म येत नाही तर सबरीमालात तो धर्म अडवा का येतो असा खडा सवाल त्यांनी मॅक्सवुमन शी बोलतांना केला आहे.