“ मुख्यमंत्री महोदय तुम्ही जनतेची कामे केल्याचा दावा सत्य असेल तर अशी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची वेळ का येत आहे? “ असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला. राष्ट्रवादीच्या युवती उपाध्यक्ष मनिषा काटे यांना मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानबध्द करण्यात आले आहे. या संदर्भाने खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला.