विधानसभा निवडणूकीच्या धामधुमीत सर्वच पक्षाचे उमेदवार आपला प्रचार करत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार.
अजित पवार यांच्या प्रचाराला आता खुद्द त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सरसावल्या आहेत. नुकतचं त्यांनी जळोची येथील काळेश्वर मंदिरात नारळ वाढवून पतीच्या विजयाचं साकडं घातलं.
त्यानंतर प्रभाग क्रं. 6 येथून प्रचारासाठी पदयात्रा केली आहे. यावेळी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. ‘विकासाचा वादा, अजितदादा’ असा नारा या पदयात्रेत लावला आहे.