मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांना पुणे कसबा पेठ मतदारसंघातुन उमेदवारी न दिल्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता होती. या उत्सुकतेवर सकारात्मक प्रतिसाद देत
रुपाली पाटील यांनी 'मॅक्सवुमन'शी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.
महिलांना राजकारणात येणं सोपं नसतं. मात्र त्या सर्वांवर मात करत कुठल्याही राजकीय वारशाव्यतिरीक्त जेव्हा महिला राजकारणाच्या रणांगणात उतरते तेव्हा अनेक राजकीय खेळीची ती शिकार ठरते.
पक्षाचा निर्णय मी एक कार्यकर्ती म्हणून मान्य करते असं रुपाली पाटील म्हणाल्या.
मी ज्या परिस्थितीतून जातेय तसं इतरांनी जाता काम नये. यापुढे कोणत्याही महिलेवर राजकारणात अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.