नाट्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा विष्णूदास भावे गौरव पदक पुरस्कार २०१९ ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे.
१९६० पासून आखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त श्रेष्ठ कलाकारास हा पुरस्कार देऊन सन्मानित करत असतं. आजपर्यंत बालगंधर्व ते जयंत सावरकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना विष्णूदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा विष्णूदास भावे गौरव पदक पुरस्कार रोहीनी हट्टंगडी यांच्या नावे जाहीर केला आहे. नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते ५ नोव्हेंबरला पदक वितरण सोहळा होणार आहे. हट्टंगडी तब्बल ४९ वर्षे कला क्षेत्रात काम करत आहेत. 'गांधी' चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. नाटकांबरोबरच मराठी, हिंदी सिनेमा तसेच सहा तेलुगू चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. शिवाय अनेक हिंदी-मराठी मालिकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.