मुंबई आणि मुंबईची लोकल हे नातं किती घट्ट आहे हे मुंबईतील प्रवाशांना ज्ञात आहेत. मात्र या लोकल मधून प्रवास करताना किती धमछाक होते आणि अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अलीकडे धावत्या लोकलमधील महिला डब्यावर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.
मात्र रेल्वे पोलिसांनी योग्य दखल घेतल्यामुळे हे प्रमाण कमी झालं आहे. मात्र अशा हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना आर्थिक मदत देण्याची तरतूद रेल्वे प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महिला डब्यावर होणाऱ्या हल्ल्यामुले जखमी होणाऱ्या महिलांना मदत मिळावी यासंदर्भात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर यावर तोडगा काढण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक बोलावली होती.
हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना आर्थिक मदत देण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. अश्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या महिलांना रेल्वे कडून देखील आर्थिक मदत मिळावी यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.