सुशील कुमार शिंदे यांचा राजकीय वारसा असलेल्या प्रणिती सुशीलकुमार शिंदे विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रणिती शिंदे पेशाने वकील आणि समाजसेविका असून त्यांच्या जाई जुई या स्वयंसेवी संस्थेमार्फत लोकांना मदत करतात.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांचे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. मात्र या आव्हानावर मात करून पुन्हा एकदा प्रणिती शिंदे आमदार झाल्या आहेत.