साकळाई पाणी योजनेच्या अध्यक्ष दिपाली सय्यद यांच्या बाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खा. सुजय विखे यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे.
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी ‘तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पाहायला जात जा, साकळाई योजना फक्त सुजय विखेच करू शकतो. असं म्हणत विखे यांनी दिपाली सय्यद यांच्याबाबक आक्षेपार्ह विधान केलं आहे. याबाबत दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे.
“खासदार सुजय विखे यांनी माझ्याबाबत केलेलं विधान चुकीचे आहे. या संदर्भात त्यांनी माझी माफी मागावी, अन्यथा मी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करेन.” असं दिपाली सय्यद यांनी केलं आहे.