शेकऱ्यांच्या पिंकाना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेतर्फे दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी मालाला चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी राज्यांनी एपीएमसी म्हणजेच कृषी बाजार समित्या बंद करुन ई-नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला योग्य दर मिळणे शक्य होत नाही. यामुळे एपीएमसी या यंत्रणेऐवजी ई-नामकडे अधिक गतीने राज्यांनी वळायला हवे.” असे त्यांनी सांगितले. आठवडा, दोन आठवड्यात देशातील जवळपास ७५०० कृषी बाजार समिती ई-नामला जोडण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारखा ऑनलाईन प्लटफॉर्म शेतकऱ्यांना मिळणार आहेत.