महिलांच्या खिलाडूवृत्तीला चालना मिळावी यासाठी 'नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया' तर्फे महिला थ्रो बॅाल स्पर्धा कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. या स्पर्धेमध्ये तरुणी आणि महिला खेळाडूंचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
या स्पर्धेत महिलांच्या ६ टीम सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक टीममध्ये १४ खेळाडू होते. या खेळाचं आयोजन कविता जैन, दिप्ती जैन आणि शालिनी गंधारी यांनी केलं होतं.
आज प्रत्येक खेळात महिलेला प्राविण्य आणि आनंद मिळायला हवा, शरीर सदृढ ठेवायचं असेल तर आज जागतिक खेळ खेळायला हवेत असं मत कविता जैन यांनी व्यक्त केलं.
https://youtu.be/bnSLryqB6L4