राष्ट्रवादी काँग्रेसच्या तासगावच्या आमदार सुमन पाटील यांनी अपघातग्रस्तांना मदत करत लोकप्रतिनिधीचं कर्तव्य पार पाडलं.
दोन दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघातून प्रवास करत मणेराजुरी मार्गे गव्हाण रोड येथे दोन दुचाकींचा अपघात झाल्याचे त्यांनी पाहीले. या अपघातातील जखमींना तातडीने रूग्णालयात नेण्यासाठी सुमनताईंनी तात्काळ अँब्युलन्स बोलावली. रुग्णांना घटनास्थाळावरुन रुग्णालयात नेईपर्यंत सुमनताई त्याठिकाणी थांबल्या आणि अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.