बेलापूर मतदार संघात गणेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. या अनुषंगाने त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना ऐरोली मधून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु स्वत: संदीप नाईक यांनी गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी असा, प्रस्ताव मांडला. यावर झालेल्या बैठकीत बहुमताने मंजुरी दिल्यानं संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढतील हे निश्चित झाले. या राजकीय घटनेचे कौतुक सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा, त्यांची किती आण-बाण आणि शान होती. आज भाजप वाल्यांनी त्यांचं काय ठेवलंय? असं म्हणत नाईक यांना भाजपात मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही सुप्रिया यांनी व्यक्त केलं आहे.