काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून शिवसेनेचे आशिष मोरे यांचे त्यांना आव्हान होते. धारावी विधानसभा मतदारसंघ हा १७८ क्रमांकांचा मतदारसंघ आहे.
मुंबईतल्या विधानसभा मतदार संघांपैकी सर्वात वेगळा मतदारसंघ म्हणून धारावी मतदारसंघाकडं बघितलं जातं. आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून या परिसराची ओळख. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिक इथं राहतात.
याशिवाय शेकडो छोटे मोठे लघु उद्योगही परिसरात केले जातात. अनेक जाती धर्माच्या लोकांचं वास्तव्य इथं आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. इथे 33 टक्के मुस्लिम, 25 टक्के मराठी, 25 टक्के दक्षिण भारतीय तर 5 टक्के गुजराती समाजाचे मतदार आहेत. 2004 पासून ते 2014 पर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड सातत्यानं विजयी झाल्या आहेत.