काँग्रेस प्रचारासाठी प्रियांका गांधी नांदेडमध्ये

Update: 2019-10-10 15:31 GMT

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच पक्ष आपल्या प्रचार सभा घेत आहेत. यादरम्यान काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचार सभेची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी १६ ऑक्टोबरला नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

अध्यक्ष राहुल गांधी यांची 13 ऑक्टोबरला मुंबईत सभा घेणार असुन सोनिया गांधी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सभा घेतील. यातील एक नागपुरात होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही संयुक्त सभा राज्यात होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

Similar News