सुमनताई पाटील यांचा तासगाव मतदार संघातून विजय

Update: 2019-10-24 11:33 GMT

तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादीतुन निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणूकीत सुमन पाटील या ११५७३७ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.

आर. आर. पाटील यांच्या अकाली मृत्यू नंतर तासगावचं प्रतिनिधित्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता? मात्र, आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आबांच्या पश्चात कुटुंबप्रमुख या नात्याने मतदारसंघाची जबाबदारी घेतली.

सुमनताईंना सहानुभूतीच्या बळावर आमदारपद मिळाले असले तरी त्यांनी मतदारसंघातल्या कामातून आबांचा वारसा समर्थपणे चालवत असल्याचं दाखवून दिलंय.

Similar News