राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणं हेच आमचं ध्येय - पंकजा मुंडे

Update: 2019-10-13 12:46 GMT

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची थेरगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

पंकजा मुंडेंच्या भाषणा दरम्यान काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ निर्माण केला. त्यामुळे पोलीसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.

“राष्ट्रवादीच्या घड्याळात १० वाजून १० मिनीटे असतात. आता २४ ऑक्टोंबरला हे घड्याळ कायमचे बंद करायचं हेच आमचं ध्येय,” असं पंकजा मुंडे आपल्या भाषणादरम्यान म्हणाल्या.

कॉंग्रेसमुक्त देश आणि राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा भाजपने केली होती. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ती घोषणा पूर्ण केली असल्याचं पंकजा मुंडे यांनी भाषणादरम्यान म्हंटल आहे.

Similar News