‘जिकडं भेळ तिकडं खेळ’- रुपाली चाकणकर

Update: 2019-10-12 12:49 GMT

राष्ट्रवादीचे महाआघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्राचारासाठी दौंड तालूक्यातील वरवंड येथील सभेत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.

“दौंड तालुका म्हणजे माझे माहेर आहे. तालुक्यात काय विकास केला, हे सांगायला दिल्लीवरुन लोक आय़ात केली जातात. आमदारांनी तालुक्यातील एका तरुणाला तरी नोकरी लावली आहे का?” असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला. तसंच यापुढे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका असंही त्यांली म्हटलं आहे.

“आर. आर. पाटील गृहमंत्री असताना राज्यात मोठया प्रमाणात पोलिस भरती झाली. पण सध्याच्या गृहमंत्र्यांच्या काळात किती पोलिस भरती झाल्या? याचा विचार कोणी केला आहे का?”

तसंच “आमदार राहुल कुल यांच्या घरात पक्ष किती आहेत? तीन माणस अन चार पक्ष, जिकड भेळ, तिकड खेळ, अशी त्यांची अवस्था आहे.” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.

Similar News