नाईक आणि म्हात्रे यांच्या चढाओढीत शेवटी मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्याचवेळी आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ असे त्यांनी सांगितले होतं आणि त्यांचा शब्द खरा ठरला. राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना हरवून सलग दुसऱ्यांदा बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.